वैभववाडी तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत मंगळवारी नव्याने 2 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आल्या आहेत.आता पर्यंत 80 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत.यामध्ये मंगळवारी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीमध्ये एका पोलीसाच्या संपर्कातील वैभववाडी तांबेवाडीतील दोन व्यक्तीचा समावेश आहे.सांगूळवाडी येथे सध्या 18 कोरोना बाधित व्यक्ती उपचार घेत आहेत.त्यापैकी 14 व्यक्ती सांगूळवाडी येथील कोविड कक्षात उपचार सुरू आहेत.3 व्यक्ती ओरोस येथील जिल्हा रुग्णांलयात उपचार घेत आहेत.तर एका व्यक्तीवर कणकवली येथे उपचार सुरू आहेत.
वैभववाडी शहरात सध्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या कमी झाल्यामुळे 9 सप्टेंबर पासून कनटेन्मेंट झोन शिथिल करण्यात आला आहे.अशी माहीत दिली आरोग्य अधिकारी यांनी दिली.