मालवण /-

मालवण शहरातील वायरी मारुती मंदिर नजीक राहणाऱ्या मंदार चंद्रशेखर चव्हाण (वय-३०) या तरुणाने दारूच्या नशेत राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी साडे आठ वाजता घडली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक सचिन पाटील, पी. जी. मोरे, सिद्धेश चिपकर यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे. मंदार हा आपल्या भावासमवेत राहत होता तर त्याचे आई, वडील मुंबई येथे वास्तव्यास आहेत. त्या या घटनेची माहिती देण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. अधिक तपास पोलिस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page