कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज शनिवार दिवसभरात मिळालेल्या माहितीनुसार १ कोरोनाचा रुग्ण मिळाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. कुडाळ तालुक्यात आज शनिवारी दि. २८ रोजी कसाल येथे १ कोरोना सक्रिय रुग्ण आढळून आला आहे.तर कुडाळ तालुक्यात एकूण ४९२ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी ४८० कंटेन्मेट झोन पूर्ण झालेत तर सध्या १२ कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत. तालुक्यात एकूण रुग्ण ११९९ तर बरे झालेले रुग्ण ११२६ आणि सक्रिय रुग्ण २९ आहेत. आतापर्यंत तालुक्यात ३७ रुग्ण दगावले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page