वैभववाडी/-
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर व मानकरी बारा पाच यांच्यामध्ये यात्रा करणे बाबत एक मत झाले आहे.त्यामुळे 144 कलम कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी हटविले आहे.मात्र मूळ कुर्लादेवी मंदिरात कलम 144 लागू केले आहे.त्यामुळे कुर्ली येथील नवीन श्री कुर्लादेवी मंदिरात वार्षिक त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव गाव मर्यादित शासनाचे नियम पाळून करण्याचे आदेश प्रांताधिकारी यांनी दिले आहेत.
तहसीलदार यांनी त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करण्या बाबत अर्जदार बंडू बाळकृष्ण पाटील व सामनेवाले मोहन दत्ताराम पोवार यांच्यामध्ये सुनावणी 26 नोव्हेंबर रोजी सुनावणी झाली.मात्र मानकरी यांच्या मध्ये त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करण्या बाबत एक मत झालेले नाही. त्यामुळे कुर्ली तालुका वैभववाडी येथील श्री कुर्लादेवी मंदिर बुडीत क्षेत्र,नवीन कुर्लादेवी मंदिर व श्री गांगोदेव मंदिर या तिन्ही मंदिरामध्ये 144 कलम मनाई आदेश लागू करण्यात आला होता.त्यानंतर 27 नोव्हेंबर रोजी कुर्ली देवस्थान उपसमिती मार्फत प्रांताधिकारी यांच्याकडे या निर्णया बाबत अपील करण्यात आले होते.त्या अपिलाची सुनावणी 28 नोहेबर रोजी सायंकाळी 3 वाजता तहसीलदार कार्यालय येथे प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्या समोर झाली.यामध्ये सामनेवाले व अर्जदार यांनी आपआपसातील वाद संपुष्टात आणून यात्रा सामंजस्याने पार पाडणार असल्याचे सांगितले.
नवीन कुर्ला देवी मंदिरात दिनांक 29/ 11 /2020 रोजी त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात यावा .उत्सवा वेळी मास्क परिधान करणे ,शारीरिक अंतराचे पालन करणे,थर्मल स्किनिंग करणे, वारंवार हात घुणे,तसेच सॅनिटायझरचा वापर करणेबंधनकारक राहील. तसेच पवार समाजाणे बांधलेल्या श्री देव गांगो मंदिरात शासन नियमाचे पालन करून दिवाबत्ती व पुजाआर्चा करन्यास कोणीही अडथळा करू .या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड संहिता कलम 188 प्रमाणे शिक्षेस पात्र होईल.