कुडाळ /-
तालुक्यात अवैद्य रित्या वाळू वाहतुक होते की नाही हे पाहण्यासाठी आंदुर्ले खिंड येथे वाहन तपासणी करीता थांबलेल्या कुडाळ तहसीलदार अमोल फाटक व त्यांच्या सोबत असलेल्या कर्मचार्यावर लाकडी काठ्या व बाटल्या घेवुन अंगावर हल्ला करण्याच्या हेतूने धावुन येणार्या व वाळु वाहतुक रोखण्यासाठी बाहेर पड़ाल तर तंगडा तोडु असे सांगत शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी संशयित चित्तरंजन पी. सावंत यांच्यासह अन्य तीन अज्ञात व्यक्ती विरोधात निवती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तहसीलदार फाटक व त्यांच्या पथकावर वाळु व्यावसायिकांनी केलेल्या हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी निवती पोलिस ठाण्यात तहसीलदार अमोल फाटक यांनी तक्रार दिली की, तालुक्यात अवैद्य गौण खनिज वाहतुक रोखणेकरीता गस्त घालण्यासाठी ते शुक्रवारी मध्यरात्री शासकीय वाहनांने इतर महसुल कर्मचार्यां सोबत आंदुर्ले खिंड येथे मध्यरात्री 1:55 वाजण्याच्या सुमारास अवैद्य गौण वाहतुक रोखणेकरीत वाहने तपासणी थांबले असता त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.