कुडाळ /-

श्री देव कुडाळेश्वर मंदिरात आज २९ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे सर्व नियम पाळून साजरा होणार आहे. कोविड- १९ महामारीच्या साथीमुळे यंदा श्री देव कुडाळेश्वर चरणी उत्सव मंडळ आयोजित कै. अॅड. अभय देसाई स्मृती ४५ वी सिंधुदुर्ग जिल्हा स्तरीयभजन स्पर्धा नवरात्रउत्सव ते कोजागिरी पौणिमा या कालावधीत ऑनलाईन घेण्यात आली होती. या भजन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सभारंभ उद्या सायंकाळी ५ वाजता कुडाळ पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर सांयकांळी ६ वाजता सदगुरू प्रासादिक भजन मंडळ, वैभववाडी (बुवा विकास नर ) यांचे भजन होईल. सायंकाळी ७ वाजता दिपोत्सव व कोहळा दिप पुजन व प्रज्वलन, ७.३० वाजता श्री देव कुडाळेश्वर मित्र मंडळ कुडाळ निर्मित “ऑर्केस्ट्रा अनलॉक’ होणार आहे. तरी सर्व भक्तांनी, श्रोत्यांनी सोशल डिस्टनसिंग पाळून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page