वैभववाडी/-
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर व मानकरी यांच्यामध्ये यात्रा करणे बाबत मतभेद झाला आहे.पार्टी क्र 1 व पार्टी क्र 2 यांच्या मध्ये त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करण्या बाबत एक मत झालेले नाही. त्यामुळे कुर्ली तालुका वैभववाडी येथील श्री कुर्लादेवी मंदिर बुडीत क्षेत्र,नवीन कुर्लादेवी मंदिर व श्री गांगोदेव मंदिर या तिन्ही मंदिरामध्ये 144 कलम मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.
मौजे कुर्ली ता.वैभववाडी येथे 29 नोव्हेंबर रोजी वार्षिक त्रिपुरारी पौर्णिमा जत्रोत्सव च्या पार्श्वभूमीवर मूळ कुर्ला देवी मंदिर हे देवधर धरणाच्या बुडीत क्षेत्रात येत आहे.सर्व उत्सव नवीन मंदिरात केले जातात. या मंदिरामध्ये काही भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात, धरनामध्ये पाणी आहे. सदरचे क्षेत्र अभियंता मध्यम प्रकल्प विभाग ,आंबडपाल ,कुडाळ, मु. फोंडाघाट यांनी निसिद्ध केलेले आहे. त्यामुळे मूळ कुर्लादेवी मंदिरात 29 नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव साजरी करू नये.कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे . यात्रा भरल्यास कोविड चा प्रादुर्भाव वाढू शकतो .भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे .तरी मूळ कुर्ला देवी मंदिर ,नवीन कुर्ला देवी मंदिर व श्री गांगो देव मंदिर या तिन्ही मंदिरात यात्रेबाबत योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी पोलीस निरीक्षक वैभववाडी अतुल जाधव यांनी तहसीलदार आर.जे.पवार यांच्याकडे केली होती. याबाबत 26 नोव्हेंबर रोजी तहसीलदार कार्यालय यांच्या दालनात कुर्ली देवस्थानचे मानकरी यांची सुनावणी घेण्यात आली. त्यामध्ये पार्टी क्रमांक 1 मधील कृष्णा पाटील वगैरे यांनी श्री देव गांगो मंदिर येथे ओटी भरणे ,गणेश पूजन करणे असे कार्यक्रम करायचे नाहीत असे सांगितले. तसेच पार्टी नंबर 2 दोन मधील वसंत पवार यांनी गांगो देव मंदिर येथे केवळ ओटी भरणे ,गणेश पूजन कार्यक्रम करून नवीन कुर्ला देवी मंदिरामध्ये उत्सवांमध्ये सामील होणार असल्याचे सांगितले. दोन्ही पार्टीनी सामंजस्याची भूमिका घेण्याचे तहसीलदार यांनी सांगितले. मात्र त्यांच्यामध्ये समझोता झालेला नाही, त्यामुळे तहसीलदार वैभववाडी आर.जे.पवार यांनी दिनांक 28 नोव्हेंबर रोजी रात्री 12 पासून 30 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत कुर्ला देवी मंदिर परिसर व नवीन कुर्ला देवी मंदिर परिसर व श्री गांगो देव मंदिर परिसर असा 200 मीटर मध्ये कोणीही प्रवेश करू नये,या तिन्ही ठिकाणी 144 कलम लागू करण्यात आलेले आहे .या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस भारतीय दंड संहिता कलम 188 प्रमाणे शिक्षेस पात्र होईल.