साटेली -भेडशी भोमवाडी येथील कॅनल मध्ये कोसळली कार..

साटेली -भेडशी भोमवाडी येथील कॅनल मध्ये कोसळली कार..

दोडामार्ग /-

दोडामार्ग तालुक्यामधील साटेली-भेडशी भोमवाडी येथील कॅनल मध्ये अरुंद रस्त्यामुळे जी.ए .o७ .–.७१११ ही कार वाहन चालकाचा ताबा सुटल्याने कॅनल मध्ये कोसळली असून, सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही ही कार कॅनलच्या रोडवरून भोमवाडी येथील मुख्य रस्त्याकडे येत असताना हा अपघात घडला असून कार कॅनल मध्ये पडते वेळी ग्लास फोडून वाहनचालकाने उडी मारल्याने जीवित हानी देखील टळली असून तिलारी आंतरराज्य पाटबंधारे महाराष्ट्र व गोवा संयुक्त प्रकल्पातून बांधण्यात आलेल्या तिराली धरणाचे पाणी गोव्यात नेण्यासाठी ह्या कॅनल ची बांधणी करण्यात आली असून ह्या कॅनल वरील रस्ता खूपच अरुंद असल्याने व या रस्त्याची खड्डेमय परिस्थिती असल्याने वाहन चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने कार कॅनल मध्ये कोसळली अशी माहिती घटनास्थळावरून मिळत आहे ,तसेच काही वेळानंतर ही कार जे सी बी च्या साहाय्याने बाहेर काढण्यात आल्याची माहिती दोडामार्ग पोलिस ठाण्यातून मिळाली आहे.

अभिप्राय द्या..