ओवळीये गावात सुरू असलेल्या तापसरीच्या साथीच्या आरोग्य तपासणीचा आम. वैभव नाईक यांनी गावाला भेट देत घेतला आढावा..

ओवळीये गावात सुरू असलेल्या तापसरीच्या साथीच्या आरोग्य तपासणीचा आम. वैभव नाईक यांनी गावाला भेट देत घेतला आढावा..

मालवण /

ओवळीये गावात सुरू असलेल्या तापसरीच्या साथीची माहिती मिळताच आज मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी ओवलीये गावाला भेट देत आरोग्य तपासणीचा आढावा घेतला. या भेटीत आम नाईक यांनी
ओवळीये वायंगणीवाडी येथील तापसरीने मृत्युमुखी पडलेल्या दिव्या खांदारे या मुलीच्या निवासस्थानी भेट देत तिच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

ओवळीयेतील तापसरीच्या सर्व लोकांचा शोध घेऊन सर्वांची आरोग्य तपासणी करण्याच्या सुचना यावेळी आ. वैभव नाईक यांनी मालवण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कुबेर मिठारी यांना दिल्या. तसेच जिल्हा रुग्णालयाच्या रेण्विय प्रयोगशाळेशी संपर्क साधत तपासणीचे रिपोर्ट ताबडतोब देण्याबाबत सूचना केल्या.

अभिप्राय द्या..