मालवण /-
शहरातील अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी जंगबहादूर प्रसाद (वय- २०) याच्याविरोधात येथील पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. काल सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास घरातल्या लहान बहिणीस बाजारात जाते असे सांगून कपडे व कागदपत्रे घेऊन अल्पवयीन मुलगी घरातून निघून गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत पोलिस निरीक्षक सोनू ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण अधिक तपास करीत आहेत.