जिल्हापरिषदेकडून जिल्ह्यातील अंध व्यक्तींना देण्यात येणार मोबाईल फोन.;समाज कल्याण समितीच्या मासिक सभेत योजनेला मान्यता

जिल्हापरिषदेकडून जिल्ह्यातील अंध व्यक्तींना देण्यात येणार मोबाईल फोन.;समाज कल्याण समितीच्या मासिक सभेत योजनेला मान्यता

सिंधुदुर्गनगरी /-

जिल्ह्यातील अंध व्यक्तीना जिल्हा परिषद मोबाईल पुरवीणार आहे. गुरुवारी झालेल्या समाज कल्याण समितीच्या मासिक सभेत याला मान्यता देण्यात आली. २०२१-२२ या पुढील आर्थिक वर्षात ही नवीन योजना कार्यान्वित होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद समाज कल्याण समितिची सभा सभापती शारदा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन संपन्न झाली. यावेळी समाज कल्याण अधिकारी मदन भीसे, सदस्य मानसी जाधव, राजलक्ष्मी डिचवलकर, अक्षता डाफळे आदिंसह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. सभेची सुरुवात सचिव मदन भीसे यानी संविधान दिनाचे औचित्य साधत संविधान शपथ वाचन करीत केले. यावेळी जात, पात, धर्म न पाळता संविधान पाळन करावे, असे आवाहन केले. यावेळी समाज कल्याण विभागाच्या योजना जास्त असल्याने आठ तालुका पंचायत समितीत प्रत्येकी एक व जिल्हा स्तरावर कंत्राटी कर्मचारी नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी नवबौद्ध घटक विकास आराखड्यासाठी सर्व गावांची माहिती आली नसल्याने आराखड्याला मंजूरी देण्यात आली नाही. तसेच समाज मंदिर बांधून पाच वर्षे पूर्ण झाल्यावर पावसामुळे सीमेंट छत लीकेज होते. त्यामुळे दुरुस्तीसाठी निधी मिळावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी २० टक्के शेष मधील अनेक प्रस्तावांना मान्यता देण्यात आली.

अभिप्राय द्या..