वेंगुर्ला /-
वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड ग्रामपंचायत उपसरपंचपदी शिवसेनेच्या अस्मिता आनंद परब यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक तुषार हळदणकर यांनी काम पाहिले.संघटनेत ठरल्याप्रमाणे माजी उपसरपंच वासुदेव चंद्रकांत कोंडये यांनी २६ ऑक्टोबर रोजी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी सोमवारी २३ नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात आले. यावेळी अस्मिता परब यांचा एकच अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सरपंच जान्हवी परब, शिवसेना उपतालुकाप्रमुख शशिकांत परब, तंटामुक्ती समिती अध्यक्ष तुकाराम परब,माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रा.प.सदस्य सुभाष सावंत, वासूदेव कोंडये, ग्रा. पं. सदस्य दयानंद वेंगुर्लेकर, सुश्मिता परब, सुविधा नेमण, सुवर्णलता जबडे, महानंदा घाडी, सीताराम जाधव, सामाजिक कार्यकर्ते जगदीश परब, गायेश परब, संतोष परब, आनंद परब, नंदकिशोर परब यांनी नुतन उपसरपंचांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, जिल्हा परिषद सदस्य नितीन शिरोडकर, पंचायत समिती सदस्य श्यामसुंदर पेडणेकर यांनी नुतन उपसरपंच अस्मिता परब यांचे अभिनंदन केले.