वेंगुर्ला तालुका खरेदी विक्री संघातर्फे भात खरेदीला शुभारंभ..

वेंगुर्ला तालुका खरेदी विक्री संघातर्फे भात खरेदीला शुभारंभ..

वेंगुर्ला /-

वेंगुर्ला तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, वेंगुर्ला व मार्केटिंग फेडरेशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भात खरेदीचा शुभारंभ वेंगुर्ला तालुका खरेदी विक्री संघ चेअरमन एम. के. गावडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
वेंगुर्ले कॅंप येथील संघाच्या गोदाम ठिकाणी या भात खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा बँक संचालिका सौ.प्रज्ञा परब, मार्केटिंग फेडरेशन सिंधुदुर्गचे श्री. गवळी, सदानंद तुळसकर, तालुका पत्रकार संघ सचिव दाजी नाईक, विलास फोवकांडे, मनोहर कुबल, मंदार गावडे यांच्या साहित शेतकरी उपस्थित होते. यावेळी बोलताना एम. के. गावडे म्हणाले की, गेल्या तीन चार वर्षात शासनाने चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना भाताचा दर दिला आहे. यावर्षी अद्याप पर्यंत केंद्रशासनाच्या वतीने बोनस जाहीर झाला नाही तो लवकरात लवकर जाहीर करून शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन हा बोनस जाहीर करावा. कारण इतर दिलेली नुकसान भरपाई अजून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही. तालुक्यातील शेतकऱ्यांनी खासगी ठिकाणी भात न विकता सहकाराच्या व शासनाच्या माध्यमातून शासनाकडे भात विक्री करावी, जेणेकरून शेतकऱ्यांंच्या खिशात चार पैसे जास्त जातील. सर्व शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी, असे श्री. गावडे यांनी सांगितले. मार्केटिंग फेडरेशन सिंधुदुर्ग व याबाबत आमदार वैभव नाईक यांनी शासनाकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर भात खरेदी सुरू झाली याबद्दल त्यांचे त्यांनी आभार मानले.

अभिप्राय द्या..