मालवण /-
प्रतिथयश उद्योजक सागर वाडकर आणि नगरसेवक मंदार केणी यांनी पुन्हा एकदा आपलं दातृत्व दाखवून दिलं आहे. मंगळवारी मालवण ग्रामीण रुग्णालय तसेच मंडळ अधिकारी कार्यालयात त्यांनी मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप केले. सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेला देखील यावेळी मास्क आणि सॅनिटायझर देण्यात आले.
काही दिवसांपूर्वी सागर वाडकर आणि मंदार केणी यांनी मालवणात ग्रामीण रुग्णालय, पोलीस ठाणे आणि तहसिल कार्यालयात पीपीई किट आणि मास्क वाटप केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी मास्क आणि सॅनिटायझर सुपूर्द केले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी पुन्हा एकदा कोरोनाची लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सिंधुदुर्ग किल्ल्यावर मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांचा विचार करून किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेला हे साहित्य देण्यात आले. यावेळी सागर वाडकर, मंदार केणी यांच्यासह संतोष कुराडे, प्रदीप उगले, बाबू वाघ, नामदेव पोटले तसेच किल्ला प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष मंगेश सावंत आदी उपस्थित होते. त्याचप्रमाणे ग्रामीण रुग्णालयात डॉ. बालाजी पाटील तर मंडळ अधिकारी कार्यालयात मंडळ अधिकारी निपाणीकर व तलाठी तेली यांच्याकडे ही मास्क आणि सॅनिटायझर सुपूर्द करण्यात आली.
