मनसे कार्यकर्ते पांडुरंग उर्फ अभिजित खांबल यांच्यावर गुन्हा दाखल..

दोडामार्ग /-

निवासी जागेत व्यवसायाचा दाखला द्या या मागणीसाठी दोडामार्ग नगरपंचायत मध्ये गेलेले कसई दोडामार्ग सावंतवाडा येथील रहिवाशी पांडुरंग उर्फ अभिजीत खांबल यांनी मुख्याधिकारी शिवराज गायकवाड यांना धक्काबुक्की केली असा आरोप ठेवून त्याच्यावरती भारतीय दंड विधान ३५३,३२३,५०४,५०७ नुसार शासकीय कामात अडथळा व शासकीय कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करणे अशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दोडामार्ग साहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांनी दिली.
दुपारी पांडुरंग उर्फ अभिजीत खांबल हे नगरपंचायत क्षेत्रात आपण राहत असलेल्या निवासी जागेत व्यावसायिक दाखला द्यावा यासाठी गेले होते यावेळी मुख्याधिकारी व खांबल यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी मुख्याधिकारी यांनी नियमानुसार तुमचे काम केले जाईल असे सांगून आपल्या खुर्चीवरून उठून जात असतेवेळी त्यांना खांबल यांनी अटकाव करून धक्काबुक्की केल्याची तक्रार यावेळी मुख्याधिकारी शिवराज गायकवाड यांच्या वतीने दोडामार्ग पोलिस स्टेशनला देण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास दोडामार्ग पोलीस करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page