अमित वेंगुर्लेकर यांना ‘दादासाहेब फाळके आयकॉन अवार्ड कोव्हीड योध्दा २०२०’ प्रदान

अमित वेंगुर्लेकर यांना ‘दादासाहेब फाळके आयकॉन अवार्ड कोव्हीड योध्दा २०२०’ प्रदान

ह्यूमन राईट्स प्रोटेक्शन ट्रस्ट नवी दिल्लीचे महारा्ट्र प्रदेश सह सचिव अमित वेंगुर्लेकर यांना ‘दादासाहेब फाळके आयकॉन अवार्ड कोव्हीड योध्दा २०२०’ प्रदान करण्यात आला. मुंबई येथे झालेल्या शानदार समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोरोना काळात केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. अचणीच्या काळात मदत करणाऱ्या चित्रपट श्रुष्टीतील कलाकार, मिडिया क्षेत्रातील संपादक, पत्रकार, संशोधक, एनजीओ आदी क्षेत्रातील व्यक्तींना हा मानाचा पुरस्कार बहाल करुन सन्मानित करण्यात येत आहे. वेंगुर्लेकर यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्याचं सर्वत्र अभिनंदन होत आहे. बँकॉक येथील अभ्यास परिषदेत भारतातील विविध राज्यातील चाळीस लोकांच्या निवडीत अमित वेंगुर्लेकर यांचाही सामावेश होता.

तेथील अंभ्यास परिषदेत थायलंड मध्ये इंटरनॅशनल प्राइड ऑफ इंडिया 2018 या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आल. राष्ट्रीय लोकमुद्रा कला साहित्य संस्कृती पुरस्कार 2018 सामाजिक कार्याची दखल घेऊन शासकीय निमशासकीय कार्यालये संस्था यांच्या कडे पीडितांच्या समस्या लेखी स्वरूपात अर्जाद्वारे हस्तांतरित करून योग्य न्याय मिळवून दिल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. ह्युमन राईट्स प्रोटेक्शन ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना हा मानाचा पुरस्कार देण्यात आला.

अभिप्राय द्या..