सावंतवाडी /-

कलंबिस्त ते वेर्ले नदीवरील मंजूर नवीन पुलाचे काम लवकर सूरु करण्यात यावे, अशी मागणीचे निवेदन सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती सदस्या अस्मिता राणे, बाबी राऊळ, चंद्रकांत राणे उपस्थित होते निवेदनात म्हटले की, सन २०१७-१८ मध्ये कलंबिस्त-वेर्ले पूल मंजूर झाले. मात्र आजपर्यंत कोणतीही निविदा झाली नाही. तसेच या ठिकाणी सार्वजनिक बांधकामतर्फे बोअरवेल टेस्ट २०१९ मध्ये झालेली आहे. तसेच हे पूल बांधण्यासाठी १ कोटी रूपये मंजूर झाले असतानाही या कामाबाबत आजपर्यंत निविदा प्रक्रिया का होत नाही व ती कशामुळे राहिली हे आम्हाला समजणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page