वेंगुर्ला /-

वेंगुर्ला – कोरोनाचे संकट असल्याने यावर्षी वेंगुर्ला येथील श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव साध्या पद्धतीने व तालुका मर्यादित करण्याचा निर्णय देवस्थान विश्वस्त समिती, उत्सव समिती व मानकरी मंडळी यांच्या झालेल्या सभेमध्ये घेण्यात आला आहे.
वेंगुर्ल्याची ग्रामदेवता व वेंगुर्ला तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणा-या श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव कार्तिक पौर्णिमा (त्रिपुरारी पौर्णिमा) रविवार २९ नोव्हेंबर २०२० रोजी संपन्न होणार आहे. या जत्रोत्सवासाठी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच गोवा, कर्नाटक राज्यातून अनेक भाविक देवीच्या दर्शनासाठी व आपले नवस फेडण्यासाठी येत असतात. मात्र, यावर्षी कोरोनाचे संकट असल्यामुळे हा जत्रोत्सव अत्यंत साधेपणाने व तालुका मर्यादित असणार आहे. जत्रा कालावधीमध्ये वेंगुर्ला तालुक्याच्या बाहेरील मिठाई, खाद्यपदार्थ, हॉटेल व खेळण्यांची दुकाने तसेच इतर दुकानदारांना गावात प्रवेश असणार नाही. त्यामुळे कोणीही गर्दी करु नये. मंदिरात येताना भाविकांनी शासनाच्या आरोग्य यंत्रणेच्या सूचनेनुसार मास्क, सॅनिटायझेशन व सोशल डिस्टंसींग आदी नियमांचे पालन करावे असे आवाहन देवस्थान समिती व परब मानकरी यांच्यावतीने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page