मसुरे /-
मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समिती संचालित ओझर विद्या मंदिर कांदळगाव या माध्यमिक शाळेस विद्यार्थ्यांची तपासणी करण्यासाठी आवश्यक असणारे थर्मल गन व ऑक्सिमीटर हे साहित्य कांदळगाव ग्रामपंचायतच्या वतीने भेट देण्यात आले.
प्रशालेच्या वतीने शिक्षण संस्थेचे पदाधिकारी माजी सभापती श्री उदय परब यांच्याकडे विनंती करण्यात आली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन श्री परब यांनी त्वरित कांदळगाव ग्राम पंचायतीस विनंती केली व ग्रामपंचायतच्या सहकार्याने दोन्ही उपकरणे उपलब्ध करुन देण्यात आली. त्यामुळे ओझर विद्या मंदिर ही शाळा अनेक दिवसांच्या लॉक डाऊन नंतर विद्यार्थ्यांची तपासणी करुन सुरु करण्यात आली. शाळा सुरु करण्याबाबत पालकांची सकारात्मक भुमिका महत्वाची ठरली.
शाळेसाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणे त्वरित उपलब्ध करुन दिल्याबद्दल कांदळगाव ग्राम पंचायत सरपंच सौ.उमदी उदय परब, उपसरपंच श्री आनंद आयकर, ग्रामसेवक श्री.सागर शिवाजी देसाई तसेच इतर सर्व ग्रा.पं.सदस्य आणि श्री उदय परब यांचे शाळेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. या प्रसंगी प्रशालेचे प्रभारी मुख्याद्यापक श्री.डी डी जाधव, सहा.शिक्षक श्री.पी के राणे, एन एस परुळेकर, श्री.एस जे सावंत श्री.पी आर पारकर, कर्मचारी श्री.आर जे जाधव, एम डी परुळेकर,बी एस पताडे आदि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थीत होते.