सावंतवाडी /-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सावंतवाडी तालुकाध्यक्ष पदी पुंडलिक दळवी यांची प्रदेशाध्यक्ष मा.जयंतराव पाटील यांनी केली निवड. गेले काही महिने रिक्त असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदावर पुंडलिक दळवी यांच्या नावाची घोषणा आज प्रदेशाध्यक्ष मा.जयंतराव पाटील यांनी करून एका तरूण कार्यकर्त्यांला संधी दिल्याने सावंतवाडी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेत चैतन्य पसरलेले आहे.