सावंतवाडी पालिकेने हटविलेले ते स्टॉल शिवसेना -राष्ट्रवादी काँग्रेस ने पुन्हा उभारले..

सावंतवाडी पालिकेने हटविलेले ते स्टॉल शिवसेना -राष्ट्रवादी काँग्रेस ने पुन्हा उभारले..

सावंतवाडी /-

संत गाडगेबाबा मंडई येथील पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हटविलेला स्टॉल शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व नागरिकांनी त्याठिकाणी जात तो स्टॉल पुनश्च उभारला.सोमवारी संत गाडगेबाबा मंडई येथील स्टॉल पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हटविल्याने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन सुरू केले. यावेळी नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध करण्यात आला यावेळी रूपेश राऊळ म्हणाले की, नगरपालिका प्रशासनाने एका सुशिक्षत बेराजगार तरूणाने लावलेला स्टॉल कोणताही लेखी आदेश हटवून त्या तरूणावर अन्याय केला आहे. मुख्याधिकारी यांच्या पळपुटे धोरणामुळे उद्याही हे आंदोलन पुन्हा उभारण्यात येईल. जोपर्यंत त्या स्टॉल धारकाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपला हा लढा असाच सुरू राहील, असे राऊळ यांनी यावेळी सांगितले. दरम्यान यावेळी आंदोलनकर्त्यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी स्टॉल लावण्यासंदर्भात पत्र मागितले. मात्र पत्र न मिळाल्याने अखेर शेवटी आंदोलनकर्त्यांनी संत गाडगेबाबा मंडई येथे जात तो स्टॉल उभारला. उद्या मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून अंतीम निर्णय घेण्यात येईल, असे आंदोलन्केत्यांकडून सांगण्यात आले. या आंदोलनात शिवसेना तालुकाप्रमुख तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, नगरसेविकाअनारोजीन लोबो, नगरसेविका भारती मोरे, नगरसेविका शुभांगी सुकी, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, शहरप्रमुख शब्बीर मणीयार, शिवसेना महिला तालुकाप्रमुख अपर्णा कोठावळे, राष्टवादी व्यापारी सेल पुंडलिक दळवी, चित्रा देसाई, माजी नगरसेवक सुनील पेडणेकर व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते.

अभिप्राय द्या..