कुडाळ /-
कुडाळ पंचायत समितीच्या माजी सदस्या अमृता धुरी (४०, रा. साळगाव-धुरीवाडी) यांचे ह्दय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. रविवारी रात्री १० वाजण्याच्या दरम्यान अमृता यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना कुडाळ येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, सासू व दिर असा परिवार आहे. साळगावचे सरपंच उमेश धुरी यांच्या त्या पत्नी होत. अमृता धुरी यांच्या निधनाने साळगाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. साळगाव येथील स्मशानभूमीत आज सायंकाळी उशिरा अमृता यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.