२६ नोव्हेंबर च्या “देशव्यापी लाक्षणिक संपात” शिक्षक परिषद प्राथमिक विभाग सहभागी होणार.;जिल्हाध्यक्ष गणेश नाईक

२६ नोव्हेंबर च्या “देशव्यापी लाक्षणिक संपात” शिक्षक परिषद प्राथमिक विभाग सहभागी होणार.;जिल्हाध्यक्ष गणेश नाईक

कुडाळ /-

२६ नोव्हेंबर च्या “देशव्यापी लाक्षणिक संपात” महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग सिंधुदुर्ग संपुर्ण जिल्हा कार्यकारणीसह सहभागी होणार आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष गणेश नाईक यांनी मीडियाशी बोलताना दिली.पुढे गणेश नाईक बोलताना सांगितले की आमच्या सर्व शिक्षकांच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत…

✅ परिभाषित अंशदायी पेन्शन/राष्ट्रीय पेन्शन योजना धारक शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.
✅ आश्वासित प्रगती योजना अंतर्गत जिल्हा परिषद शिक्षकांना १०-२०-३० प्रमाणे वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करणे.
✅ शिक्षण सेवकांचे मानधन सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर महागीनुसार ३०,०००/- रुपये करण्यात यावे.
✅ कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करावी.
✅ वैद्यकीय प्रतिपूर्तीसाठी तिमाही बजेट मंजूर करणे.
✅ जिल्हा परिषद शाळांची वीज बिले शासनाने अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांनी भरावीत.
✅ पटसंख्येची अट न ठेवता जिल्हा परिषदचे शाळा बंद करणेत येऊ नयेत.
✅ शासन परिपत्रक व शासन निर्णयानुसार आंतरजिल्हा बदली आदेश झालेल्या सर्व शिक्षकांना कार्यमुक्त करणेत यावे.
✅ सर्व पदवीधर विषय शिक्षकांना सरसकट वेतनश्रेणी लागू करावी.
✅ COVID – 19 झालेल्या शिक्षक बंधुभगिनींची वैदयकीय बिले तात्काळ मंजूर करावीत.. अश्या मागण्या मीडियाशी संवाद साधताना गणेश नाईक यांनी सांगितल्या.

अभिप्राय द्या..