कणकवली /-
कोकण रेल्वेच्या धडकेने अनोळखी महिलेचा मृत्यू झाला आहे. हुंबरठ बौद्धवाडी नजीकच्या रेल्वे ट्रॅकवर शनिवारी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास हा अपघात घडला. रेल्वे पोलीस बलाचे जवान पाटील यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दुर्घटनेची माहिती दिली. त्यानुसार एपीआय सागर खंडागळे , पीएसआय अनमोल रावराणे , महिला पोलीस हवालदार ममता जाधव , कॉन्स्टेबल राहुल तळसकर , योगेश राऊळ यांनी घटनास्थळी पंचनामा केला. डीवायएसपी डॉ.नितीन कटेकर यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी करत पुढील तपासासाठी सूचना केल्या. रेल्वेच्या धडकेत अज्ञात महिलेच्या देहाचे अनेक तुकडे होऊन सर्वत्र पडले होते.मृत महिला ४० ते ४५ वर्ष वयाची असल्याचा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला आहे.मृत महिलेच्या कंबरेखालील भाग गेला होता तुटून व्यक्त केला आहे. चेहरा छिन्न विच्छिन्न झाल्यामुळे मृत महिलेची ओळख पटविण्यात अडचण येत आहे.मृत महिलेच्या अंगात भगव्या रंगाचा ब्लाउज , सफेद रंगाची साडी, चांदीचे दुपदरी मंगळसूत्र, पायांत पॅरागॉन कंपनीच्या ५ नं चप्पलांचा जोड आहे. मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणून शवविच्छेदन करण्यात आले. मृत महिलेसंदर्भात माहिती असल्यास कणकवली पोलीस ठाणे दूरध्वनी क्रमांक ०२३६७ – २३२०३३ अथवा मोबाईल क्रमांक ८४२४ ९ ७८२२२ / ९ ४२००४५८४६ | ७०२१ ९ २६८६८ वर संपर्क साधण्याचे आवाहन कणकवली पोलिसांनी केले आहे.