वैभववाडी /-
वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे येथील 54 वर्षीय गृहस्थ कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे.
कोकिसरे येथील 54 वर्षीय गृहस्थ उपचारासाठी कणकवली व अन्य ठिकाणी गेले चार दिवस फिरत होते.त्यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले होते.त्यांना ताप व खोकला सुरू असल्याने त्याचा स्वब घेतला होता.त्याचा रिपोर्ट शनिवारी 21 नोव्हेंबर रोजी पॉझिटिव्ह आढळून आला आहे.गेले 15 दिवसांपूर्वी 5 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या होत्या. त्या सर्व व्यक्ती बऱ्या झाल्या आहेत.आता पर्यंत 144 रुग्ण आढलेले आहेत.दिवाळी नंतर पुन्हा वर्दळ वाढत आहे.त्याचा परिणाम कोरोना संसर्ग वाढण्यासाठी होण्याची शकता आहे.
वैभववाडी तालुक्यात नव्याने कोरोना संसर्गचे रुग्ण आढळल्यामुळे सर्वानी शासनाच्या नियमांचे पालन करून स्वतःचे संरक्षण स्वतः करणे गरजेचे आहे.