विजयदुर्ग /-

नोव्हेंबर भारतातील सर्वात खोल असलेले विजयदुर्ग बंदर विकासासाठी १० कोटींचा निधी देत २०१९ ला मंजूरी देण्यात आली होती.अखेर एका तक्रारदाराच्या आडमुठे धोरणामुळे शेकडो लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या बंदर विकसित कामाला स्थगिती मिळाल्याने स्थानिक मच्छिमार, नागरिकांचे मोठे नुकसान होणार आहे. सध्या या बंदरे विकसित होत असलेल्या जेटीवर दीडशे कामगार व विविध प्रकारच्या चार कोटी रुपयांच्या मशनरी उभे आहेत. पुरातत्व विभागाकडून परवानगी न घेतल्याचे कारण दाखवत हे काम स्थगित करण्याचे आदेश मत्स्य आयुक्तांना देण्यात आले.त्यानुसार शापूर्जी पालोनजी अँड कंपनी प्रा. लिमिटेड या ठेकेदार कंपनीला आयुक्त मत्सव्यवसाय कार्यकारी अभियंता यांनी काम आज पासून स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत.

विजयदुर्ग बंदरात नव्याने मासळी उतरवण्याच्या केंद्रावर मच्छिमारांना मूलभूत सोयी-सुविधा पुरवणे हे का पुरातत्व विभागाच्या अनुमतीशिवाय सुरू केल्याचे आदेशात म्हटले आहे.बंदर विकास कार्यक्रमांतर्गत दहा कोटीचा निधी देऊन जेटीचे काम हाती घेण्यात आले होते.एका तक्रारदाराने तक्रार केल्यानंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण कोल्हापूर सुपर मंडल विजयदुर्ग किल्ला यांनी सदर काम स्थगित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शनिवारी संबंधित ठेकेदाराला आयुक्तांनी पुढील आदेश येईपर्यंत काम स्थगित करण्याचे आदेश दिले.त्यामुळे या ठेकेदार कंपनीचे मोठे नुकसान होणार आहे.त्याचबरोबर हे काम करत असताना स्थानिक व बाहेरील असे मिळून १५० कामगार काम करत होते.त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. सदर कामात पुरातत्व विभागाची परवानगी मिळेपर्यंत वेळ लागेल. कारणे सरकारी काम असल्यामुळे काही दिवसांनी या विकसित बदलासाठी मंजुरी मिळेल. मात्र त्या आदेशाप्रमाणे हे काम स्थगित करण्यात आले, त्याचा फटका भविष्यात जिल्ह्यातील नागरिकांना बसणार आहे.कारण विविध गड-किल्ल्यांचा पासून ३०० मीटर पर्यंत कुठेही बांधकाम किंवा असलेल्या घरांमध्ये बदल करावयाचा असल्यास त्याची परवानगी पुरातत्त्व विभागाकडून घ्यावी लागणार आहे.त्यानुसार विजयदुर्ग किल्ला, देवगड व रेडी बंदर या ठिकाणच्या अनेक वर्ष राहत असलेल्या नागरिकांना या आदेशानुसार पुढील काळात त्रास सहन करावा लागणार आहे. काही वर्षांपूर्वी साखर कारखान्यांमधील मॉलीशीश (मळी) वाहतूक केली जात होती. मात्र संबंधित तक्रारदाराने तक्रार दिल्यानंतर त्याला बंदी आली.परिणामी दररोज दीडशे ते दोनशे ट्रक या ठिकाणी दररोज वाहतूक झाल्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळत होता. तो रोजगार हिरावून घेण्याचं काम त्या तक्रारदारांनी केले गेले.आजही तोच प्रयत्न या बंदर जेटी विकासात संबंधी तक्रार करत असल्यामुळे स्थानिकांमध्ये मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे.या विषयांमध्ये स्थानिक सरपंच याना कुठले विश्वासात घेतले जात नसल्याचे समजते. मच्छीमारांचे होणार मोठे नुकसान- प्रसाद देवधर विजयदुर्ग गावात रोजगार नसल्यामुळे अनेक तरुण बेरोजगार झालेले आहेत. त्यातच कोरोना महामारीत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.

काही महिन्यांपासून विजयदुर्ग बंदर जेटी काम सुयेऊ झाले होते ल.त्यामुळे स्थानिकांना रोजगार निर्माण झाला होता. त्याचबरोबर नव्याने विकसित होत असलेले बेटी बंदर मच्छीमारांसाठी उपयुक्त होती.मच्छीमारांना सध्या जेटी व्यवस्थित नसल्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत होता.मात्र या विकसित होत असलेल्या कामाला स्थगिती दिल्यामुळे स्थानिक मच्छिमार,नागरिकांचे मोठे नुकसान होणार असल्याची प्रतिक्रिया विजयदुर्ग सरपंच प्रसाद देवधर यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page