कणकवली /-
वीज बिल माफीची घोषणा करुन दुप्पट बिले दिली गेली.लोकांना शिवसेनेला निवडून दिल्याची चूक कळलेली आहे.भाजपा सरकारच्या काळातील वीज थकबाकी कळायला वर्ष लागले काय ? हे सरकार वर्षभर झोपले होते का ? राज्यातील तीन पक्षाच्या सरकार मध्ये जो सावळा गोंधळ सुरु आहे. तो कशासाठी ? आघाडी सरकारच्या मंत्र्यांमध्ये एक वाक्यता नाही.भाजपचे यापेक्षा अधिक मोठे आंदोलन जिल्हात केले जाईल.पोलिसांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही.जिल्हात आमचीच सत्ता हे पोलिसांनी विसरु नये,असा इशारा भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिला.
कणकवली येथील भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. निवडणूक आचारसंहितेचा बाऊ करत वीज माफी देण्यास धूळफेक चालू आहे. सरकार विरुद्ध हा जनतेचा रोष आहे.सर्वच पक्षाचे लोक वाढलेल्या बिलांमुळे त्रस्त आहेत.बिलांचा घोळ ,एमइसीबी करत असलेल्या जबरदस्ती विरोधात हे आंदोलन आहे. हे आंदोलन पोलिसांच्या विरोधात नाही . पोलिसांनी जिल्ह्यात झालेल्या अवैधरित्या कडे लक्ष द्यावे. निसर्ग वादळाचे फक्त ३५ लाख जमा झाले.१४ कोटी ९३ लाख मागणी केली होती. गतवर्षीच्या भात नुकसानीतील १० कोटी ५५ लाख मागणी होती.फक्त ५ कोटी ५० लाख मिळाले.सत्ताधारी सांगतात की शेतकऱ्यांना न्याय देणार तो कसा?मच्छीमार बांधवांना पॅकेजचा उपयोग नाही.काँगेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सेनेत पक्ष प्रवेश करण्यासाठी जेव्हा फिरतात तेव्हा कोरोनाचा संसर्ग होत नाही काय ?त्यांना पोलीस नोटिसा देत नाही?मग आमच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करताना १४९ या नोटिसा का दिले जातात? हा दुजाभाव का केला जातो सत्ताधाऱ्यांनी आम्हाला त्रास दिल्यास आणखी जोमाने आंदोलन केले जातील असा इशारा देखील राजन तेली यांनी दिला आहे. भाजपा १४ मंडळात कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.संघटना मजबूत करण्यासाठी काम सुरु आहे.१५०० कार्यकर्ते कोणत्याही विषयावर चर्चा सत्रात भाग घेतील असे शिक्षण दिले जात आहे.शाळा सुरु झाल्या नाही तर पुढे होणाऱ्या परिणामाचा जबाबदार कोण ? ग्रामीण भागात पटसंख्या कमी आहे.एसटी, ट्रेन सर्व सुरु झाले.त्यामुळे शाळा सुरु केल्याच पाहिजेत. मात्र काळजी घेतली पाहिजे, मुलांच्या आरोग्यची काळजी घेऊन शाळा सुरु करा,असेही भजापा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सांगितले.