नारूर गावच्या श्री देवी महालक्ष्मी जत्रोत्सव साधेपणाने आणि गावमर्यादित करण्याचा ग्रामस्थांचा निर्णय..

नारूर गावच्या श्री देवी महालक्ष्मी जत्रोत्सव साधेपणाने आणि गावमर्यादित करण्याचा ग्रामस्थांचा निर्णय..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाणारे नारूर निवासनी श्री देवी महालक्ष्मी जत्रोत्सव दि 29/11/20 रोजी संपन्न होत आहे. या जत्रेसाठी महाराष्ट्रातून तसेच गोवा व कर्नाटक राज्या मधून अनेक भाविक येत असतात मात्र यावर्षी कोरोना संकट असल्याने संपन्न होणारा जत्रोत्सव अत्यंत साधेपणाने व गाव मर्यादित करण्याचे देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती चार बारा गावकर मंडळी तसेच बहू मानकरी व गाव पुरोहित गावातील प्रमुख व्यक्तींच्या उपस्थितीत झालेल्या मिटिंग मध्ये ठरविण्यात आले आहे.तरी जत्रा कालावधी मध्ये बाहेरील दुकाने तसेच खाद्यपदार्थ दुकाने व खेळणी दुकाने व इतर दुकानदारांना गावात प्रवेश असणार नाही. त्यामुळे कोणीही गर्दी करू नये. तसेच पालखी सोहळा अत्यंत साधेपनाने साजरा केला जाईल रात्री 12 नंतर दर्शन पूर्णपणे बंद असेल तसेच मोकळ्या जागेत वालावलकर दशावतार नाट्यप्रयोग प्रयोग होईल तरी काही भाविक हे अगरशाळेत व इतर ठिकाणी जे तीन ते चार दिवस मुक्कामी असतात त्यांना या वर्षी नारूर गावात मुक्काम करता येणार नाही तरी कृपया सर्व भाविकांनी गर्दी करू नये असे आवाहन श्री देवी महालक्ष्मी देवस्थान नारूरच्या वतीने श्री राजा तेली व दीपक नारकर यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..