कुडाळ बाजारपेठ मित्रमंडळ आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ७० रक्तदात्यांनी केले रक्तदान..

कुडाळ बाजारपेठ मित्रमंडळ आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ७० रक्तदात्यांनी केले रक्तदान..

कुडाळ /-

जिल्हा रुग्णालय ओरोस येथील रक्तपेढीमध्ये रक्ताचा साठा कमी असल्याने शनिवार दि 21 नोव्हेंबर 2020 रोजी बाजारपेठ मित्र मंडळ कुडाळ यांच्या वतीने मारुती मंदिर धर्मशाळा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले .बाजारपेठ मित्रमंडळ,कुडाळ आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ७० रक्तदात्यांनी सहभाग घेत रक्तदान केले. जिल्ह्यात सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्या अनुषंगाने बाजारपेठ मित्रमंडळाने येथील श्री देव मारूती मंदिर नजिकच्या धर्मशाळा येथे शनिवारी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्ष ओंकार तेली, अभय शिरसाट, मंदार चंद्रकांत शिरसाट, आनंद शिरवलकर, सुनील बांदेकर, चेतन पडते, दिनार पडते, आबा धडाम, नितीश म्हाडेश्वर, अभि गावडे, डाॅ.राजेद्र केळकर, सुमेध साळवी, ओंकार साळवी, भूषण मठकर, कपिल शिरसाट, सचिन सावंत, अमेय पेडणेकर, चेतन धुरी, प्रथमेश पडते चिन्मय बांदेकर, शशांक पिंगुळकर, संदेश पडते, दिपक भोगटे, तन्मय वर्दम, नंदन वर्दम, अक्षय सावंत, सौरभ शिरसाट, गुरू कोरगांवकर, ऋषिकेश शिरसाट, ऋजेश शिरसाट, चेतन बांदेकर, मनस्वी पेडणेकर आदींसह बाजारपेठ मित्रमंडळाचे सदस्य व रक्तदाते उपस्थित होते. या शिबिराला जिल्हा रूग्णालय रक्तपेढी विभागाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. राजेश पालव, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी सुनील बागवे, अधिपरिचारीका हेमांगी रणदिवे, किशोर नांदगांवकर, नितीन गांवकर, उल्हास राणे, सुरेश डोंगरे यांचे सहकार्य लाभले. रक्तदान शिबिर आयोजनाबद्दल जिल्हा रक्तपेढी विभागाच्या वतीने आयोजक मित्रमंडळाला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची खबरदारी घेऊन हे शिबिर घेण्यात आले.

अभिप्राय द्या..