युवा फोरम भारत संघटना” कुडाळ तर्फे सविता आश्रम अणाव येथे कपडे दान..

युवा फोरम भारत संघटना” कुडाळ तर्फे सविता आश्रम अणाव येथे कपडे दान..

कुडाळ /-

सविता आश्रम अणाव येथे कोरोना संसर्गामुळे ,आणि एकच वेळू २७ कोरोना रुग्ण या आश्रम येथे सापडल्याने,सविता आश्रम अणाव येथे आश्रमातील सारे कपडे जाळण्यात आले होते.त्यामुळे थंडीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीआधी “युवा फोरम भारत संघटने” तर्फे सर्वत्र कपडे दान करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते.अनेक जणानी विविध भागतुन वस्त्रे अणुन दिली.या मदतकार्यास युवा फोरम ने चांगलीच मदत केली आहे.

“वस्त्र” ही माणसाची मूलभूत गरज मानलेली असून ती दान करून आपण समाजसेवेतील महत्त्वाचे काम केले आहे.आपण सर्वांकडून नेहमीच असे सहकार्य लाभो अशी युवा फोरम आशा बाळगत आहे. कुठल्याही प्रसंगी युवा फोरम ला साद घातल्यास आमचे स्वयंसेवक मदतीस सज्ज होतिल असे युवा फोरम भारत संघटना संस्थापक व संघटना प्रमुख यशवर्धन जयराज राणे म्हणाले. माणसाने माणसाशी माणुसकिने वागावे हयासठी युवा फोरम भारत संघटना कायम प्रयत्नशील राहिल,असे सांगितले.

अभिप्राय द्या..