साळगाव येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख दिगंबर सावंत यांचा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या उपस्थितीत भाजपमद्धे प्रवेश..

साळगाव येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख दिगंबर सावंत यांचा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या उपस्थितीत भाजपमद्धे प्रवेश..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यातील साळगाव येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख व निष्ठावंत कार्यकर्ते श्री. दिगंबर सावंत यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री.राजन तेली यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. अनेक वर्षे शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून काम करत होते असताना साळगावमध्ये शिवसेना पक्ष वाढविण्यात त्यांचा महत्वाचा सहभाग होता. भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धती मुळे प्रेरित होऊन आज त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशाच्या वेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई, माजी सभापती ऍडव्होकेट विवेक मांडकुलकर, भाजपचे नेते राजू राऊळ, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद सावंत, साळगाव सरपंच श्री उमेश धुरी, अस्मिता बांदेकर, दादा साईल, पप्या तवटे, मोहन सावंत, बंड्या सावंतव अन्य मान्यवर उपस्थित होते

अभिप्राय द्या..