वैभववाडी /-

शेतात काम करत असताना वीज अंगावर पडून मृत्युमुखी पडलेल्या लवू वसंत मांडवकर रा. लोरे नं. 2 दुधमवाडी यांच्या वारसांना शासनाकडून चार लाख रुपयांची मदत प्राप्त झाली आहे. आर्थिक मदतीचा धनादेश वैभववाडी तहसीलदार रामदास झळके यांनी लवू मांडवकर यांच्या पत्नी श्रीमती रुचिका मांडवकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे. यावेळी मंडल अधिकारी दीपक पावसकर, सामाजिक कार्यकर्ते रितेश सुतार, कोतवाल बाळू पेडणेकर, श्री माने आदी उपस्थित होते.
शेतात काम करत असताना लवू मांडवकर यांचा अंगावर वीज पडून त्यांचा दुर्दैवी अंत झाला. ही घटना 27 जून 2020 रोजी घडली होती. या घटनेची नोंद नैसर्गिक आपत्ती म्हणून करण्यात आली होती. आपत्तीग्रस्त कुटुंबाला मदत मिळावी यासाठी संबंधित विभागाकडून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. चार महिन्यानंतर शासनाकडून वारसांना मदतीचा धनादेश प्राप्त झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page