जनता दल पक्षाचे समाजवादी नेते उदय नाडकर्णी यांचे निधन…

जनता दल पक्षाचे समाजवादी नेते उदय नाडकर्णी यांचे निधन…

जनता दल पक्षाचे समाजवादी नेते उदय नाडकर्णी (७५) यांचे राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले.लहान पणापासूनच समाजवादी ,विचारसरणीने जीवन जगणारे उदय नाडकर्णी यांनी माजी केंद्रीय मंत्री मधु दंडवते, समाजवादी नेते बबन डिसोझा, किशोर पवार, जयानंद मठकर, माजी आमदार बाली किनळेकर, पुष्पसेन सावंत या समाजवादी नेत्यांबरोबर काम केले.
माजी आमदार बाली किनळेकर यांचे ते सचिव म्हणून काम करीत असत. जनता दल पक्ष संघटनेसाठीही त्यांनी काम केले. त्यांच्या निधनाने जिल्ह्यातील समाजवादी विचासरणीचा अवलिया काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली.

अभिप्राय द्या..