आचरा /-
कोरोना म्हातारीच्या पार्श्वभूमिवर त्रिंबक ग्रामस्थांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेल्या आॅक्सिमीटर व थर्मलगनचे वितरण त्रिंबक बौद्ध विकास मंडळ मुंबईकडून त्रिंबक ग्रामपंचायतीला करण्यात आले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र त्रिंबक येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला सरपंच विलास त्रिंबककर, माजी सभापती अशोक बागवे,प्रमोद बागवे, श्रीकांत बागवे, स्थानिक मंडळाचे अजय पवार,दत्ता पवार, विवेक जाधव, कृष्णा पवार,यांसह अन्य ग्रामस्थ आदी उपस्थित होते.त्रिंबक बौद्ध विकास मंडळाच्या या सहकार्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.