कसबा वाळवेत बंगल्याचा कङी कोयंङा तोङून 2 लाख 15 हजार रूपये लंपास

कसबा वाळवेत बंगल्याचा कङी कोयंङा तोङून 2 लाख 15 हजार रूपये लंपास

कोल्हापूर /-

कसबा वाळवे ता. राधानगरी येथे संदिप फराक्टे यांच्या घरी गुरुवारी रात्री दोन्ही दरवाजे तोडून अज्ञांतानी दोन लाख पंधरा हजाराची जबरी चोरी केली. गेल्या तीन महिन्यातील ही मोठ्या चोरीची दुसरी घटना असल्याने परिसरात घबराट पसरली आहे.
कसबा वाळवे येथील पिराचीवाडी मार्गावरील महावितरण वीज वितरण कंपनीच्या शेजारी संदिप फराक्टे यांचा बंगला आहे. फराक्टे यांचे गावामध्ये किराणा दुकान आहे . घरातील सर्व मंडळी दुकानाकडे गेली होती. त्याचाच फायदा घेत चोरट्यांनी दुकानातील विक्रीची २लाख १५ हजाराची रोख रक्कम घराचे दोन्ही दरवाजे तोडून पसार केली.
चोरट्यांनी प्रथम मागील दरवाज्याने आत येण्याचा प्रयत्न केला . पण दरवाजा न तुटल्याने चोरट्यांनी दगडाने पुढील दरवाज्याचा कडी – कोयंडा तोडून आत प्रवेश केला . व कपाटाचे कुलूप न निघल्याने चोरट्यांनी कपाटाचे दोन्ही दरवाजे मोडून ही रोख रक्कम लंपास केली.
संदिप फराक्टे यांनी राधानगरी पोलीस ठाण्यामध्ये चोरीची नोंद केली. त्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. त्यानंतर ठसेतज्ञांना पाचारण केले. व तज्ञांनी कडी- कोयंडा ,दरवाजा व कपाटाचे ठसे घेवून प्रयोगशाळेत पाठवले. तपासासाठी श्वानपथकाला पाचारण केले. पण इमारतीच्या परिसरातच ते घुटमळले. घटनास्थळी राधानगरीचे पोलीस निरीक्षक उदय डुबल , कोल्हापूर ग्रामीणचे डी. वाय एस पी अनिल कदम यांनी भेट दिली. अाधिक तपास राधानगरीचे पोलीस करत आहेत.

तालुक्यातील गावांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यासाठी वेळोवेळी आवाहन केले . पण ग्रामस्थांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आज त्याठिकाणी कॅमेरा असता तर चोरट्यांना चोरी करण्याला आळा बसला असता व पोलीसांना तपास कार्यात देखील गती आली असती.पोलीस निरीक्षक उदय डुबल

अभिप्राय द्या..