त्रिंबक येथे जनावरांची आरोग्य तपासणी शिबिर संपन्न..

त्रिंबक येथे जनावरांची आरोग्य तपासणी शिबिर संपन्न..

आचरा/-

पशुवैद्यकीय दवाखाना आचरा आणि ग्रामसचिवालय त्रिंबक यांच्या सहकार्याने त्रिंबक येथे जनावरांची आरोग्य तपासणी, लसिकरण, वंध्यत्व तपासणी,व जनावरांना इनाफ टॅगिंग आदी करण्यात आले.या शिबिराला पशुपालकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत सत्तर जनावरांची तपासणी केली गेली.
या शिबिराचे उद्घाटन त्रिंबक सरपंच राजू त्रिंबककर यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांच्या सोबत पंचायत समिती सदस्य व माजी उपसभापती अशोक बागवे, उपसरपंच श्रीकांत बागवे, पोलीस पाटील सिताराम सकपाळ,प्रमोद बागवे, किशोर त्रिंबककर,अमेय लेले, निलेश लोके, पशुवैद्यकीय विभागाचे डॉ उमेश पेंडूरकर, डॉ मिताली कवटकर, डॉ व्ही जी सवारे, तसेच परीचर परुळेकर, तांबे आदी उपस्थित होते.यावेळीआचरा पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉ उमेश पेंडूरकर यांनी जनावरांचे पालन पोषण या बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

अभिप्राय द्या..