स्वामी समर्थ मठाचे कार्य प्रेरणादायी.;सुरेश ठाकूर

स्वामी समर्थ मठाचे कार्य प्रेरणादायी.;सुरेश ठाकूर

आचरा /-

आचरा शिक्षक काॅलनी येथील स्वामी समर्थ मठातील सेवेकरयांकडून सुरू असलेले सामाजिक कार्य हे जनसेवा हीच दत्त सेवा मानून सुरू असून प्रेरणादायी असल्याचे मत साहित्यिक सुरेश ठाकूर यांनी आचरा येथे व्यक्त केले.

स्वामी समर्थ मठातर्फे पिडीत वयोवृद्धांना आसरयासाठी सुरू करण्यात आलेल्या वृद्धाश्रमाच्या उद्घाटन आणि दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी त्यांच्या सोबत स्वामी समर्थ मठाचे संस्थापक स्वामी भक्त दिपक लोणे, सौ लोणे, माजी सरपंच राजन गांवकर, अनिल करंजे, सुनील खरात, डॉ सुहास आचरेकर, सुर्यकांत राणे, सदानंद बांदेकर,दाजी गांवकर,अपर्णा मयेकर,संत़ोष बोरकर,मनाली फाटक,संजय लोके,बाबू धुरी,संगीता राणे, मुणगेकर काका आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी वृद्धाश्रमाचे उद्घाटन वायंगणी येथील वृद्ध वायंगणकर यांच्या हस्ते केले गेले.यावेळी प्रास्ताविक करताना डॉ सुहास आचरेकर यांनी मठातर्फे सुरू असलेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती देताना वीना मोबदला शीत शव पेटी उपलब्ध करून देण्यात आली आहे.आधारहीन वृद्धांना आसरा देण्यासाठी वृद्धाश्रम सुरू करण्यात आला आहे.भविष्यात रुग्णांना तात्पुरती गरज असलेल्या वाॅकर,व्हील चेअर मठाच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील खरात यांनी तर आभार बांदेकर यांनी मानले.

अभिप्राय द्या..