पाट हायस्कुलचे कलामंदीर माजीं विद्यार्थ्यांच्या कलाकृतीने सजले..

पाट हायस्कुलचे कलामंदीर माजीं विद्यार्थ्यांच्या कलाकृतीने सजले..

कुडाळ /-

कोरोच्या काळात मुंबईतून गावात आलेले विद्यार्थी ,नोकरदार, गावकरी यांनी अजूनही गावातच राहणे पसंत केलेले आहे. काही विद्यार्थी घरा कडूनच ऑनलाइन जॉब करत आहेत .यामधील अल्पेश घारे जे .जे .स्कूल ऑफ आर्ट .रोहित येरम रहेजा स्कूल ऑफ आर्ट मुंबई सिद्धेश साळसकर दळविज आर्ट इन्स्टिट्यूट कोल्हापूर .कुमार राज कुंभार आणि प्रथमेश करलकर हे विद्यालयातील विद्यार्थी यांनी नाविन्यपूर्ण निसर्गचित्रण संकल्प चित्र काढून कला मंदिराला एक कलात्मक रूप दिलेले आहे .मुंबईतील ॲनिमेशन कंपनीमध्ये स्टोरीबोर्ड. कार्टून असे काम हे विद्यार्थी करतात. त्याचप्रमाणे डिजिटल कॅनवास पेंटिंग ची सुद्धा काम सुरू आहेत .यांच्या या नाविन्यपूर्ण कलाकृतीने पाट हायस्कूलच्या कला मंदिराचे रूप पालटले आहे. त्यासोबत मुलांनी केलेले कोलाज चित्रे आणि इतर चित्र पाहायला मिळतात भावी पिढीतील मुलांसाठी हा कलात्मक ठेवाच आहे.

अभिप्राय द्या..