मालवण /-

आंबेडकरवादी परिवर्तन चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, वक्ते कुशल संघटक तसेच मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटीच्या श्रीदेवी शांतादुर्गा हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक व भंडारी हायस्कूलचे माजी पर्यवेक्षक आयु. बी.डी. बनसोडे सर(मूळगाव बुलढाणा ) यांचे काल सायंकाळी ह्रदय विकाराच्या तीव्र
झटक्याने औरंगाबाद येथे निधन झाले. त्यांनी आपल्या सेवा कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात
बुद्ध, फुले ,शाहू, आंबेडकर परिवर्तन वादी चळवळीत सक्रीय सहभाग घेऊन प्रबोधन केले आहे ते एक अभ्यासक व उत्कृष्ट वक्ते म्हणून परिचित होते. ते बामसेफ , कास्ट्राईब शिक्षक संघटनेत काम करत होते.
त्यांच्या निधनाने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन विवाहित मुली,जावई, नातवंडे भाऊ पुतणे असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page