सावंतवाडी तालुक्यातील आरोग्य विभाग,पोलीस विभाग व महावितरणमधील कर्मचाऱ्यांना युवासेनेतर्फे दिवाळीनिमित्त उटणी वाटप..

सावंतवाडी तालुक्यातील आरोग्य विभाग,पोलीस विभाग व महावितरणमधील कर्मचाऱ्यांना युवासेनेतर्फे दिवाळीनिमित्त उटणी वाटप..

सावंतवाडी /-

कोरोना काळात एका योद्ध्याप्रमाणे काम केलेल्या सावंतवाडी तालुक्यातील आरोग्य विभाग, पोलीस विभाग व काहीशी दुर्लक्षित राहिलेले महावितरणमध्ये सेवा करणारे कर्मचारी यांना युवासेना विस्तारक अमित पेडणेकर यांच्या माध्यमातून युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, युवासेना उपजिल्हाप्रमुख सागर नाणोसकर यांच्या मार्गदर्शनातून युवासेना सावंतवाडी तालुका अधिकारी योगेश नाईक, युवासेना सावंतवाडी तालुका समन्वयक गुणाजी गावडे, युवासेनेचे विनायक सावंत, उपविभाग अधिकारी देवेंद्र सावंत, विभाग अधिकारी सदा राणे, आदित्य आरेकर, विभाग अधिकारी समीर नाईक यांनी दिवाळी सणाचे औचित्य साधून उटणी देऊन दिवाळी सणाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.

यावेळी सावंतवाडी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नाथा नारोजी, शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, कोलगाव जिल्हापरिषद सदस्य मायकल डिसोझा, मळेवाड जिल्हापरिषद सदस्य राजन मुळीक तसेच तालुक्यातील तमाम शिवसेना, युवासेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

अभिप्राय द्या..