कुडाळ /-
राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक सेल ची विशेष सभा कुडाळ येथील पक्षाच्या कार्यालयात जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आणि काका कुडाळकर, सावळाराम आणावकर, बाळासाहेब कनयालकर, सुनील भोगटे,सरफराज नाईक, भास्कर परब, शिवाजीराव घोगले, ओटवणे कर यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाली. नजीर शेख यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून अल्पसंख्यांकाचे अध्यक्ष बाबा खातीब यांच्यावतीने जिल्ह्याची कार्यकारणी जाहीर केली.
जिल्हाध्यक्ष :बाबा खतीब भेडशी दोडामार्ग
कार्याध्यक्ष : नजीर शेख. कुडाळ उपाध्यक्ष: सिराज शहा. कुडाळ उपाध्यक्ष: इफ्तिकार राजगुरू सावंतवाडी
उपाध्यक्ष: रशीद खान देवगड सरचिटणीस: हमीद शेख. कुडाळ चिटणीस: विल्यम फर्नांडिस कसाल
चिटणीस: समीर खुल्ली गोंदियाळे कार्यकारणी सदस्य : नासिर अब्दुल्ला शेख. दोडामार्ग
बस्त्याव लॉरेन्स लोबो दोडामार्ग
तालुका अध्यक्ष
कुडाळ : बशीर खान झाराप
सावंतवाडी : जावेद शेख दोडामार्ग : रशीद उस्मान सय्यद.
उपस्थितांना नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी पक्षाचे ज्येष्ठ नेते सावळा राम अणावकर
यांनी सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मता बाबत मार्गदर्शन केले. अध्यक्ष अमित सामंत यांनी नवनिर्वाचित कार्यकारणीस शुभेच्छा दिल्या. श्री सीराज शहा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जिल्हा दौरा करून जास्तीत जास्त अल्पसंख्यांकांना राष्ट्रवादीच्या प्रवाहात आणणार असल्याचे सांगितले. अध्यक्ष बाबा खतीब यांनी कार्यकारणीस शुभेच्छा देऊन उपस्थित सर्वांचे आभार मानले.