ओरोस येथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत सिंधूदूर्ग दौऱ्यात जिल्ह्य़ातील प्रत्येक तालुकानिहाय पक्षीय संघटनात्मक आढावा घेण्यात आला.यावेळी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.काही विरोधक जिल्ह्य़ात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहे काय ? म्हणून सतत टिका करण्याचेच काम करत होते. आज जिल्ह्य़ातील सुमारे एक हजार कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठे? हे दाखवुन देण्याचे काम यापूर्वी राष्ट्रवादी आघाडीच्या धर्माचे पालन करून मोठे झालेल्या विरोधकांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिले.आजच्या उपस्थितीने विरोधकांना चपराक बसेल. त्यामुळे राष्ट्रवादी कुठे आहे? म्हणून विचार करणाऱ्यांना यांचे भविष्यात आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस सुसाटच असेल.पक्षीय संघटनेत चढ उतार हे प्रत्येक पक्षीय संघटनेला झेलावेच लागतात.आमच्याही प्रत्येक कार्यकर्त्यांने त्या चढ उताराचा अनुभव घेतला आहे.आता यापुढे आपल्या जिल्ह्यात संघटना मजबुत करण्यासाठी संघटीत होऊन काम करून जिल्ह्यात राष्ट्रवादीला कोणाची हिम्मत होणार नाही.की राष्ट्रवादीचे काय आहे हे विचारण्याची*_
ही तर सुरुवात आहे.अजून मोठे धमाके या जिल्ह्य़ात यापुढे दिसत राहतील जिल्ह्य़ात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नजिकच्या काळात एक नंबरला आणण्यासाठीच प्रयत्न करणार असल्याचे सांगून भविष्यात निवडणूका जिंकण्यासाठीच प्रयत्न करणार.त्यासाठी युवक संघटने बरोबरच अन्य सेलच्या माध्यमातून संघटना मजबूत करण्यावर सर्व प्रथम जोर देणार असल्याचे सांगून.भविष्यात जिल्ह्यातील राजकीय समीकरणांचा केन्द्रबिंदू हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच असेल.असे सांगून आज अचानक ठरलेला आणि जिल्ह्य़ातील कार्यकर्त्यांनी यशस्वी केलेला प्रदेशाध्यक्ष मा.जयंतराव पाटील साहेब यांचा जिल्हा दौरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना उर्जा देणारा ठरेल.यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंञी दर महिन्याला एक वेळ जिल्हा दौऱ्यावर येऊन कार्यकर्त्यांना संघटनात्मक बळ देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून आजचा ओरोस येथील पक्षाचा मेळावा कमी वेळ असूनही मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग घेतला त्याबद्दल जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणी तर्फे सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आभार मानतो.यापुढे असेच संघटनात्मक सहकार्य मिळावे.एक राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी म्हणून मी सदैव पक्ष कार्यकर्त्यांसोबत आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पक्ष संघटना काही प्रमाणात मर्यादित होती याची प्रदेशाध्यक्ष यांना जाणीव असतानाही कार्यकर्त्यांच्या मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे प्रदेशाध्यक्ष पाटील साहेब भारावले असून यापुढे या जिल्ह्य़ातील संघटनेकडे जास्त लक्ष देण्याचे सुतोवाच केले.