वेंगुर्ला रेडी हुडावाडी येथील युवक बेपत्ता..

वेंगुर्ला रेडी हुडावाडी येथील युवक बेपत्ता..

वेंगुर्ला /-

गोगटे मिनरल्स कंपनी रेडी नजीक वेल्डिंगचे काम करणारा रेडी हुडावाडी येथील रहिवासी जिवाजी उर्फ सुयोग प्रताप राणे (वय ३३) हा रविवार ८ नोव्हेंबर रोजी रात्री २ वाजण्याच्या सुमारास घरात कोणाला काहीही न सांगता निघून गेला. तो अद्याप पर्यंत न आल्याने व त्याची शोधाशोध केली असता तो न सापडल्याने आपला भाऊ जिवाजी बेपत्ता झाल्याची तक्रार महेश प्रताप राणे (रेडी हुडावाडी) यांनी वेंगुर्ले पोलिसात दिली आहे.रेडी हुडावाडी येथील जिवाजी उर्फ सुयोग राणे उंची ५ फूट, सावळ्या रंगाचा, सडपातळ बांध्याचा, दाढी वाढलेली, अंगावर काळी फुल पँन्ट व काळ्या-हिरव्या रंगाचे पट्टे असलेले हाफ टी शर्ट घातलेले आहे. अशी माहिती त्याचा भाऊ महेश राणे यांनी दिलेली आहे. अशा वर्णन असलेली व्यक्ती आढळल्यास वेंगुर्ले पोलीस स्टेशन स्टेशनशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन रेडी पोलीस दूरक्षेत्राचे ठाणे अंमलदार अजय नाईक यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..