कुडाळ/-
राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या कुडाळ तालुकाध्यक्षपदी महेश म्हाडदळकर तर कुडाळ शहराध्यपदी चिन्मय गणेश बांदेकर यांची निवड करण्यात आली आहे.सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय युवक काँग्रेस व कुडाळ – मालवण विधानसभा युवक काँग्रेसची संयुक्त बैठक रविवारी सायंकाळी कुडाळ एमआयडीसी येथील विश्रामगृह येथे पार पडली. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष व वेंगुर्ले पं.स. उपसभापती सिद्धेश परब, किरण टेंबूलकर, कुडाळ विधानसभा युवक अध्यक्ष मंदार चंद्रकांत शिरसाट, प्रवक्ता अरविंद मोंडकर, सावंतवाडी युवक विधानसभा अध्यक्ष स्वप्नील परब, कुडाळ विधानसभा महिला युवक उपाध्यक्षा पल्लवी तारी, सावंतवाडी शहराध्यक्ष साद शेख, प्रशांत गोसावी, मालवण शहर अध्यक्ष गणेश पाडगावकर, आदींसह जिल्ह्यातील युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीत युवक काँग्रेसच्या कुडाळ तालुकाध्यक्षपदी महेश म्हाडदळकर तर कुडाळ युवक शहराध्यक्षपदी चिन्मय बांदेकर यांची निवड जाहीर करून त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
यावेळी जिल्ह्यातील आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली.
तसेच युवक काँग्रेसची संघटना अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने चर्चा करून जास्तीत जास्त युवक कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.