वेंगुर्ला /-
मुंबई विद्यापीठ तर्फे शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये घेण्यात आलेल्या सेमिस्टर ६ तृतीय वर्ष परीक्षेचा बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर कॉलेज वेंगुर्लाचा रिझल्ट जाहीर झाला असून कला शाखा ९६.८३ टक्के,वाणिज्य शाखा ९९.०९%,विज्ञान शाखा १०० टक्के इतका लागला आहे.
कला शाखेतून ६३ पैकी ६१ विद्यार्थी उत्तीर्ण, वाणिज्य शाखा ११० पैकी १०९ विद्यार्थी उत्तीर्ण व विज्ञान शाखेतून ५४ पैकी ५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.विज्ञान शाखेतून शिवानी चंद्रशेखर माडकर(केमिस्ट्री) प्रथम,संजाली विजय गावडे (फिजिक्स)द्वितीय व शिवानी आनंद बांदेकर (केमिस्ट्री) तृतीय आल्या आहेत.वाणिज्य शाखेतून जस्मिता सुभाष नवार प्रथम, सुमन हरिश्चंद्र मांजरेकर द्वितीय व विनय वासुदेव कोळंबकर तृतीय आले आहेत.कला शाखेतून अनुराधा वीरधवल परब प्रथम,अंकिता सदानंद करंगुटकर द्वितीय व प्रथमेश अविनाश राणे तृतीय आले आहेत.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर सचिव प्रा.जयकुमार देसाई,पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई,प्रशासन अधिकारी डॉ. मंजिरी देसाई मोरे, कॉलेजचे प्राचार्य डॉ.विलास देऊलकर,प्राध्यापक वर्ग,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.