मसुरे /-
मसुरे गडघेरावाडी येथील रहिवासी व भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त सैनिक श्री . जयवंत दत्ताराम तोंडवळकर (७५ वर्ष) यांचे अल्प आजाराने राहत्या घरी निधन झाले. पश्चात पत्नी, दोन मुलगे, भाऊ, बहीण सुना,जावई, नातवंडे असा परिवार आहे. गावात दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. लॉक डाऊन कालावधीत अनेक गरजू कुटुंबांना त्यांनी आर्थिक मदत केली होती. येथील मंगेश तोंडवळकर, हिरेश तोंडवळकर यांचे ते भाऊ होत.