वैभववाडी /-
बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी शिवाजी राजाराम गुरखे रा.नावळे धनगरवाडा यांच्या मालकीची शेळी ठार झाली आहे. शेतकरी गुरखे यांचे सुमारे 8 हजार चे नुकसान झाले आहे. ही घटना शुक्रवारी 6 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी घडली आहे.गुरखे हे शेळ्या घेऊन आपल्या मालकीच्या जंगलात शेळ्यांना चारण्यासाठी घेऊन गेले होते.दरम्यान दबा धरून बसलेल्या बिबट्याने एका शेळीवर हल्ला केला.यात त्या शेळीचा जागीच मृत्यू झाला . या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली.त्यानंतर 7 नोव्हेंबर रोजी वैभववाडी तालुका वनविभागाचे वनपाल सदाशिव वाघरे,वनरक्षक प्रकाश पाटील घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.गेले दोन दिवसातील तालुक्यातील दुसरी घटना आहे. या पूर्वी करूळ भट्टीवाडी येथील एका शेतकऱ्यांचा पाडा बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाला होता. सतत घडणाऱ्या घटनेमुळे सहयाद्री पट्ट्यातील गावातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला वनविभागाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी जनतेमधून होत आहे.