वैभववाडी/-

नाधवडे येथील एका युवकाची घराच्या अंगणात उभी करून ठेवलेली मोटर सायकल अज्ञात चोरट्याने मध्य रात्रीच्या सुमारास चोरली आहे.मोटर सायकल मालक महेंद्र दिनकर पांचाळ असे त्याचे नाव आहे.ही घटना 4 नोव्हेंबर रोजी रात्री 1 ते 3.45 वाजल्याच्या सुमारास घडली.
नाधवडे येथील आपल्या घराच्या अंगणात उभी केलेली महेंद्र दिनकर पांचाळ यांनी आपल्या मालकीची हिरो एच एफ डिलक्स कंपनीची मोटर सायकल क्रमांक एम.एच.07 एसी 354 ही अज्ञात चोरट्याने 4 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 1 ते 4.45 वाजण्याच्या चोरून नेली आहे.शोधाशोध करूनही अध्याप मोटर सायकल सापडलेली नाही.या घटनेचा तपास वैभववाडी पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page