कुडाळ /-

भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्ष सौ उमाताई खापरे यांच्या उपस्थितीत आज कुडाळ येथे भाजपा महिला मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी संपन्न झाली.सर्व महिला पदाधिकाऱ्यांना उमाताई खापरे यांनी,पुढील वाटचालीस शुभेच्छ| दिल्या.

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा च्या प्रदेश अध्यक्षा सौ उमाताई खापरे यांनी आज सिंधुदुर्ग जिल्हा दौरा केला.महिला मोर्चा विस्तृत जिल्हा कार्यकारणी कुडाळ येथे मराठा समाज हॉल येथे आयोजित करण्यात आली होती महिला मोर्चा विविध विषयांवर चर्चा केली व नुतून महिला मोर्चा पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

कोरोनाच्या महामारीत महिला मोर्चा सर्व पदाधिकारी यांनी आपल्या ठिकाणी राहून केली कोतुकास्पद कामगिरी केली मग ते मास्क स्वतः शिवून वाटप करणे असो सॅनिटाईझ वाटप भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली मदत.सिंधुदुर्ग अजून एक महिलांसाठी चांगली गोष्ट झाली म्हणजे माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण साहेब असतील सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कार्यसम्राट आमदार नितेश राणे साहेब यांनी समाज सेवेच कार्य थांबवलं नाही त्याच्या माध्यमातून हळद क्रांती हळद लागवडीचा कार्यक्रम महिला मोर्चा माध्यमातून केला.आत्मनिर्भर माध्यमातून काळसेकर साहेबानी विशेष भूमिका बजावली,सिंधुदुर्ग महिला मोर्चा ची जिल्हा कार्यकारणी जिल्हा अध्यक्ष व कोर कमिटीच्या राणे साहेबाच्या माध्यमातून एक जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाहीर केली सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचे 14 मंडल आहेत त्याच्या वरती 14 महिला मंडल अध्यक्ष नियुक्ती जाहीर झाली महिला प्रदेश कडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन निष्क्रिय महाराष्ट्र सरकार च्या विरोधात विविध उपक्रम महिला मोर्चा वतीने जिल्हात राबविण्यात आले आक्रोश आंदोलन आसो इतर महिला मोर्चा च्या वतीने कार्यक्रम जिल्ह्यात आयोजित करण्यात आले.

त्यावेळी महिला मोर्चा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बांदा महिला मोर्चा च्या पदाधिकारी सौ रुपाली शिरसाट यांनी केले तर प्रस्तावना सिंधुदुर्ग जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा सौ संध्याताई तेरसे यांनी केली.महिला मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षा सौ संध्या तेरसे यांनी सांगितले.जिल्हा अध्यक्ष राजन तेली यांनी महिला मोर्चा च्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या व मनोगत व्यक्त केले,सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या प्रदेश पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले व सिंधुदुर्ग जिल्हा महिला मोर्चा च्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

त्यावेळी व्यासपीठावर उपस्थित प्रदेश अध्यक्ष सौ उमाताई खापरे,प्रदेश सरचिटणीस सौ जीजकर मॅडम,सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष राजन तेली,सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या प्रभारी सौ साळवी मॅडम,सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ समिधा नाईक,जिल्हा परिषदेच्या शिक्षण आरोग्य सभापती सौ सावी लोके,महिला बालकल्याण सभापती सौ माधवी बांदेकर मॅडम,समाज कल्याण सभापती शारदा कांबळी,देवगड नुतून नगराध्यक्षा सौ प्रियांका साळसकर, वैभववाडी नगराध्यक्ष कुडाळकर मॅडम,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापती सौ.नुतून आईर,मानसी धुरी,महिला मोर्चा चिटणीस घारे मॅडम,महिला मोर्चा जिल्ह्यातील जिल्हा पदाधिकारी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने कुडाळ मराठा समाज हॉल येथे उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page