अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली अनंत पिळणकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्याचा राष्ट्रवादीत प्रवेश.
_ व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिदेंद्र आव्हाड यांनी दिला प्रवेश_

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे फोंडाघाट येथील अनंत पिळणकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्याना राष्ट्रवादीत प्रवेश दिला.त्यामुळे पुन्हा अनंत पिळणकर स्वगृही परतले आहेत.राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्षपदी अनंत पिळणकर यांची निवड जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी जाहीर केली.

यावेळी कणकवली तालुकाध्यक्ष राजू पावसकर, किसान सेल अध्यक्ष समीर आचरेकर,जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी घोगळे, कणकवली विधानसभा संघटक डॉ.अभिनंदन मालंडकर, सुंदर पारकर, कुडाळ तालुकाध्यक्ष भास्कर परब, वैभववाडी तालुकाध्यक्ष रवी चव्हाण, व्यापार आघाडी अध्यक्ष पुंडलिक दळवी, रुपेश जाधव, चित्रा देसाई, आशिष कदम, प्रथमेश चोडणकर, सागर वारंग उपस्थित होते.यावेळी अभिजित रावराणे, अशोक पवार, अरुण चव्हाण, सेनापती सावंत, संतोष तेली, जयेश परब यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी अनंत पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.फोडाघाट नवीन कुर्ली वसाहत अध्यक्ष अनंत पिळणकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश झाला. पक्षप्रवेशानंतर अनंत पिळणकर यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवत असल्याचे सामंत जाहीर केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस हा जनतेच्या मनात घर केलेला पक्ष आहे. केवळ सिंधुदुर्गच नव्हे तर कोकणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेली विकासकामे अद्वितीय आहेत. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पुनरउभारणी चे काम केले जाणार आहे. कणकवली तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा आधी करून दाखवेन नंतर बोलेन अशी आपल्या कामाच्या पद्धतीची चुणूक सामंत यांनी बोलून दाखवली.

राज्यात महाघाडीची सत्ता असली तरी सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने जिल्ह्यात कार्यकर्त्यांना त्रास दिल्यास शिवसेनेविरोधात रस्त्यावर उतरणार असा इशारा सामंत यांनी दिला. धरण प्रकल्पग्रस्तांच्या नवीन कुर्ली वसाहतीची स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण व्हावी यासाठी मंत्र्यांच्या माध्यमातून पाठपुरावा करणार आहे. यापूढे अनंत पिळणकर यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस भक्कमपणे उभा राहील अशी ग्वाही सामंत यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेशानंतर अनंत पिळणकर म्हणाले, देवघर धरण बांधून ३० वर्षे होऊनही नवीन कुर्ली वसाहत साठी नवीन ग्रामपंचायत स्थापन झाली नाही. धरण प्रकल्पग्रस्तांना सेवासुविधा मिळण्यासाठी स्वतःची हक्काची ग्रामपंचायत मिळणे आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी मंत्रालयीन पातळीवर यासाठी पाठपुरावा करून ग्रामपंचायत मंजूर करून देण्याचा शब्द दिला आहे. माझ्या गाववासीयांसाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page